जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात ब्रह्मश्री परिवारातर्फे प्रेमनगर परिसरातील सप्तश्रुंगी देवी मंदिर येथे श्री परशुरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली. सकाळच्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला.
प्रेमनगर येथील सप्तश्रुंगी देवी मंदिरात आयोजित या पूजाविधीत श्री. विनायक बिडकर, सौ. आशा ताई बिडकर आणि अर्चना सरूडकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने आरती करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या पूजाविधीचे पौरोहित्य श्री. दीपक कुलकर्णी व श्री. प्रसाद पटवे यांनी केले. कार्यक्रमात अशोक कुलकर्णी, सौ. रेखा कुलकर्णी, अशोक वाघ, कमलाकर फडणीस, निलेश राव, महेंद्र जोशी, सौ. स्मिता चौधरी, दीपक महाजन, प्रशांत कुलकर्णी, सुनील कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे आयोजित भव्य मिरवणुकीत या पालखीने सहभाग नोंदवला. मिरवणुकीपूर्वी जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर येथे पालखीचे पूजन करण्यात आले. श्री. ईश्वर दीक्षित व सौ. दीक्षित यांच्या हस्ते हे पूजन पार पडले, तर पौरोहित्य नंदू शुक्ल गुरुजी यांनी केले.
या प्रसंगी ह.भ.प. मंगेश महाराज, श्रीराम महाराज, संजय दीक्षित, फडे गुरुजी, प्रसाद जोशी, कमलाकर फडणीस, निलेश राव आणि दीपक महाजन यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. धार्मिक परंपरा आणि संस्कारांचे जतन करत या कार्यक्रमाने समाजात एकात्मता आणि श्रद्धेचा संदेश दिला.



