Home Cities जळगाव भारतीय जनता पक्षाचे माजी अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस शिवसेनेत

भारतीय जनता पक्षाचे माजी अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस शिवसेनेत

0
33

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे माजी जिल्हा सरचिटणीस शकील भाई बागवान यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करून एकच खडबड उडवून दिली.

 

शकील बागवान हे भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे सक्रीय सदस्य होते. त्यांना पद्मालय शासकीय विश्राम गृह येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भांगळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून व पक्षाचा गमछा देवुन टाळ्यांचे गजरात प्रवेश देण्यात आला. शकील बागवान यांच्याशी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी कांतीलाल चौधरी , मनोज चौधरी, झाकीर पठाण, जब्बार रंगरेज आदी उपस्थित होते. शकील बागवान हे जळगाव येथील मुस्लिम समाजातील जुने जाणते नेते असून एक लेखक व शायर (कवी) म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या निवडीमूळे अल्पसंख्यांक समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. अनेक मान्यवरांनी शकील भाई चे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

 


Protected Content

Play sound