एमआयडीसीतून दुचाकी लांबविणारा संशयित आरोपी अटकेत

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील हॉटेल निलांबरी येथून दुचाकी लांबविणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी आज पहाटे कालिंका माता परिसरातून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की,  मंगल पुंडलिक पाटील (वय ५४, रा.श्रीराम समर्थ कॉलनी, पिंपळा, जळगाव) हे गणपती घेण्यासाठी मुलगा सेजस पाटील यांच्यासह मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ बीएक्स ७९२) २२ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील तोल काटा जवळील हॉटेल निलांबरीजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्किंग करून गणपती घेण्यासाठी गेले. गणपती घेऊन ६.३० वाजेच्या सुमारास पुन्हा पार्किंग लावलेल्या दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल आला होता. यागुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी सॅलविन विरेंद्रसिंग ठाकूर (वय-३५) रा. गांधी नगर, गोपाल नगर, भुसावळ या गुरूवार २७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता कालिंका माता परिसारातून एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी या गुन्ह्यात मुकूंदा डिगंबर सुरवाडे या संशयिताला अटक केली होती.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदान आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ संजय धनगर, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, योगेश बारी, चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

 

Protected Content