निमखेडी शिवारातून दुचाकीसह घरातील इन्व्हर्टर व बॅटरीची चोरी

जळगाव प्रतिनिधी ।  निमखेडी शिवारातील रामदास पार्क येथून चोरट्यांनी घरासमोर उभी दुचाकी व शेजारच्या एका घरातून इन्व्हर्टरसह बॅटरी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील  रामदास पार्क येथे शरद भगवान पाटील वय ४६ वास्तव्यास आहेत. शरद पाटील यांनी घरासमोर एम एच १९ डी  ०१२१ या क्रमांकाची त्यांची दुचाकी उभी केली होती. २३ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता घरासमोर उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतला असता मिळून आले नाही. याचदरम्यान शरद पाटील यांच्या शेजारी राहणारे मिलिंद गंगाधरराव पवार यांच्या घरातील जिन्यात ठेवलेले इन्व्हर्टर सह बॅटरी असा दहा हजारांचा ऐवज चोरट्यांनी  लांबवुन दिल्याचे समोर आले. याप्रकरणी शरद पाटील यांनी बुधवारी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिलाल पाटील हे करीत आहे.

Protected Content