चोपडा येथील महिला मंडळ शाळेत महात्म्यांना अभिवादन

chopada school

 

चोपडा प्रतिनिधी । महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आज दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी या थोर विभूती संदर्भात मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषेतून आपले विचार व्यक्त करतांना त्यांच्या जीवनातील प्रेरक व वैशिष्टयपूर्ण प्रसंग सांगितले. तसेच एस.बी.पाटील यांनी शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात डी.एस.शुक्ल यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  शाळेत आयोजित कार्यक्रम प्रसंगी मंचावर विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.एस.शुक्ल, ज्येष्ठ शिक्षक एस.बी.पाटील, बी.जी.माळी, ए.आर.महाजन, व्ही.पी.महाले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आय.लोहार यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content