आदिवासी कोळी समाजाच्या यावल तालुका उत्सव समितीची निवड

06d915af fa20 4a35 b492 14b24b04937f

यावल, प्रतिनिधी | येथील खरेदी विक्री संघाच्या सभागृहात काल झालेल्या बैठकीत ९ आँगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल विलास तायडे (बामणोद) तर उपाध्यक्षपदी भरत चिंतामण कोळी (यावल) यांची निवड करण्यात आली आहे.

 

येथे झालेल्या आदिवासी कोळी समाजाच्या तालुका पातळीवरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे होते. या बैठकीत एकमताने उत्सव समितीची निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी सदस्य म्हणुन गोकुळ तायडे (मनवेल), प्रमोद कोळी (यावल), धनराज कोळी (अंजाळे), गंगाराम तायडे (साकळी), प्रमोद सोनवणे (शिरसाड), अमर कोळी व संजय नन्नवरे (यावल) , किरण कोळी (दहिगाव) यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल आदिवासी कोळी समाजाच्या वतीने नुतन अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Protected Content