दूषित पाणीपुरवठा विरोधात मुक्ताईनगर शहर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे सततच्या होणाऱ्या दूषित व गढूळ पाणीपुरवठा विरोधात मुक्ताईनगर शहर काँग्रेसतर्फे नगरपंचायत इमारतीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

तसेच पाणी व स्वच्छता विभागातर्फे शहरात पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन अनुजैविक तपासणी करावी व बॅक्टेरिअल इन्फेक्शन  करुन गुणवत्ता तपासणी करावी व जे स्रोत दूषित आहेत त्यांचे क्लोरिनेशन करण्याचे सूचना मुक्ताईनगर काँग्रेस तर्फे देण्यात आली. आरोग्य विभाग, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर वारंवार तपासणी करून कायमस्वरूपी शहरातील पिण्याचा पाण्याचा मार्ग काढावा, नाहीतर शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा विनंती वजा इशारा शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे यांनी दिला.

याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते ॲड. अरविंद गोसावी, मागासविभाग जिल्हाउपाध्यक्ष बी.डी. गवई, यासिन खान, ॲड. राहुल पाटील, संजय पाटिल, राजू जाधव, निखिल चौधरी, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, निलेश भालेराव, शकील आझाद, आरिफ रब्बाणी, वसीम शेख, आनंदा कोळी, महेश खुळे, मितेश भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content