Home Cities जळगाव जेष्ठ नेते खडसे यांची ईडी चौकशी त्वरित थांबवा : राष्ट्रवादी सामाजिक न्याय...

जेष्ठ नेते खडसे यांची ईडी चौकशी त्वरित थांबवा : राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची मागणी

0
30


जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.     

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद  मानकरी  यांच्या  नेतृत्वात  जिल्हाधिकारी  अभिजित राऊत यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा आशय असा की,  केंद्र शासन ईडीचा गैर वापर  करत आहे.  केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करून खासकर  प्रतिष्टीत नेत्यांवर विनाकारण त्रास देण्याचे कारस्थान करीत असून ते त्वरित  थांबवावे. ईडीतर्फे एकनाथराव खडसे यांच्यावरील चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल असून तो त्वरित थांबविण्यात यावा  अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी , प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ, कल्पना अहिरे, अशोक सोनवणे. विनोद रनधे, विनोद सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound