थकीत वीजबिल माफ करा; बहुजन मुक्ती पार्टीचे मुक्ताईनगरात आंदोलन (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शासनाने थकीत वीजबिल माफ करून विज कनेक्शन कापणे व वीजपुरवठा खंडीत करणे तात्काळ थांबवावे या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार  देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सरकार सत्तेवर येण्यापुर्वी वीजबिल माफ व मोफत वीज देण्याचा नारा देवून सत्तेवर येतात. परंतू सत्तेवर आल्यानंतर वीज बिला संदर्भात राज्यात कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाही. या उलट राज्यात सामान्य ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात  वीज शुल्क आकारून लूट केली जात आहे. यात शेतकरी असतील, घरगुती वीजबिल किंवा व्यापारी असतील या सर्वांची लूट प्रत्येक सत्ताधारी करत आहे. दिवाळीत अनेकांचे थकीत वीजबिल मुळे कनेक्शन तोडण्यात आले ते तात्काळ थांबवावे अन्यथा राज्यात बहुजन मुक्ती पार्टी,  बहुजन मुक्ती पार्टी युवा व  बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

 

यावेळी बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, तालुकाध्यक्ष बिजलाल इंगळे, सिद्धार्थ हिरोळे, सुपडा हिरोळे, दिपक बोदडे ,अमोल बोदडे, भगवान कवरे ,मजीद बागवान, हमीद चौधरी , सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर विवेक सोनवणे, शेख अजगर, रमेश बोदडे, आणि कार्यकर्ते उपस्थित होते

 

Protected Content