पहूर येथे साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या शाखेचे उद्घाटन

पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी- येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या शुभ पर्वावर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या शाखेचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक मधू पांढरे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले . 

गेल्या दहा वर्षांपासून जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ तालुक्यातील नवोदित साहित्यिकांना साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहित करत आहे . जामनेर तालुक्यातील साहित्य चळवळ यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिनबंधू  डी .डी .पाटील  हे सदैव प्रयत्नशील आहेत . त्यांच्या प्रमुख उपस्थितीत  आज शुक्रवार , दि. २ऑक्टोबर  रोजी  पहूर येथे जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी त्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक मधु पांढरे म्हणाले की , साहित्य म्हणजे समाजाचे प्रतिबिंब असते .साहित्यातून समाजाचे सुखदुःख मांडल्या जाते . साहित्य निर्मिती ही अनुभवातून होत असते .नव साहित्यिकांनी आपले अनुभव शब्दबद्ध करायला हवेत.

प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी पहुर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पांढरे, सदस्य हरिभाऊ राऊत , कीर्ती घोंगडे यांनी मनोगत व्यक्त केले . मंडळाचे सचिव शंकर भामेरे ,  उपाध्यक्षा कल्पना बनकर , कोषाध्यक्ष भरत पाटील ,  सदस्य डॉ .संभाजी क्षीरसागर , अश्विनी पाटील , शहर पत्रकार संघाचे सचिव जयंत जोशी यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते . यावेळी राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनाच्या ‘भूईफोक ‘ या स्मरणिकेचे वितरण करण्यात आले .सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य  आर. टी. देशमुख यांनी केले , तर मंडळाचे सदस्य  रमेश बनकर यांनी ‘माझा बाप शेतकरी ‘ या कवीतेचे गायन करून आभार मानले. यावेळी कोरोना विषाणू संक्रमणाच्या अनुषंगाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

Protected Content