फैजपूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरूणावर फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तरूणावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. ३० ऑक्टोबर रोजी रात्री अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना गावातील अर्जून सिध्दार्थ केदारे रा. फैजपूर याने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिचा जबरदस्ती हात पकडला. तरूणाने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार अल्पवयीन मुलीने कुटुंबियातील सदस्यांना सांगितला. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अर्जून केदारे याच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.

Protected Content