वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुनश्च परीक्षेची संधी; अभाविपच्या मागणीला यश

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात कोरोना बाधित विद्यार्थ्यांना परिक्षांना गैरहजर रहावे लागले होते. अशा परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी लेखी व प्रात्यक्षिक परिक्षा झाल्यानंतर विशेष परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिध्देश्वर लटपटे यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या परीक्षा येत्या १० जूनपासून सुरु होत आहेत. या लेखी परीक्षेच्या कालावधीत ज्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जे परीक्षार्थी अनुपस्थित राहतील, अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सदर हिवाळी- २०२० ची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर विशेष परीक्षा घेण्यात येईल. सदरील परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न ग्राहय धरला जाणार नाही.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ शकतात अशा विविध समस्यांना घेऊन अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ४ जून २०२१ ला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाचे कुलसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्यात होत्या. अभाविपच्या मागण्यांचा प्रशासनाने दखल घेत योग्य तो निर्णय घेतल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. असे मत अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी व्यक्त केले आहे. तसेच विशेष परीक्षेचे वेळापत्रक देखील लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणी लटपटे यांनी केली आहे.

Protected Content