पाच लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  घराचे हप्ते फेडण्यासाठी माहेराहून ५ लाख रूपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारिरीक व मानसीक छळ केल्याचा प्रकार शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शपहरातील के.सी.पार्क येथील माहेर असलेल्या पल्लवी उमेश सपकाळे (वय-१९) यांचा विवाह कोल्ह हिल्स परिसरातील उमेश सुरेश सपकाळे यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला लहान सहान गोष्टींवरून छळ करण्या सुरूवात केली. पती उमेश सपकाळे याने विवाहितेला घराचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैशांची पुर्तता केली नसल्याने विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी देखील त्रास देणे सुरू केले. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती उमेश सुरेश सपकाळे, सासु वर्षा सुरेश सपकाळे, नंनद चैताली नन्नवरे, जेठाणी उज्जवला यशवंत सपकाळे, जेठ यशवंत सुरेश सपकाळे, ननंद साधना देवीदास साळुंखे, नंदोईभाऊ देविदास मंगा साळुखे, किसन बाबुराव सपकाळे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे करीत आहे.

Protected Content