जळगाव विमानतळ गैरव्यवहार प्रकरणी 7 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

जळगाव (प्रतिनिधी) तत्कालीन नगर पालिकेने आवाक्या बाहेरचा विषय असतानाही विमानतळ योजना तयार केली. त्यात 3 कोटी 18 लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालीन नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी केली होती. अनेक वर्षानंतर आज पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात 7 जणांवर ठपका ठेवण्यात आला असून त्यात उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष प्रदीप रायसोनी, सिंधुताई कोल्हे, लक्ष्मीकांत चौधरी, तत्कालीन मुख्याधिकारी पंढरीनाथ काळे, धनंजय जावळीकर व अटलांटा कंपनीचे संचालक राजू बरोत यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

विमानतळ बांधणे हा नगरपालिकेच्या आवाक्याबाहेरचा विषय असतानाही, त्याला मंजुरी देत विमानतळ तयार करण्याचा घाट तत्कालीन नगरपालिकेच्या नगरसेवकांनी व अधिकाऱ्यांनी घातला होता. या प्रकरणी तत्कालीन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी 2012 मध्ये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा 110/ 12 भादवि कलम 403,406,409 420 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी दि 7 रोजी न्यायालयात जवळपास 4 हजार ते 4500 कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यात मुळफिर्याद ही 226 पानांची आहे. या दोष आरोपपत्रात करार निवेदिका प्रक्रियेचा भंग करणे. करारनामा 100 रुपयाच्या बँडवर करून शासनाचे मुद्रांक शुल्काचे नुकसान करणे. अॅडव्हास दिला मात्र तो वसूल केला नाही. विमानतळ ठेका हा आवाक्या बाहेरचा असतानाही व पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतांनाही निर्णय घेतला, असे आरोप दोषारोप पत्रात ठेवण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content