जबरी चोरी आणि घरफोडीतील चोरट्याला अटक; मुद्देमाल हस्तगत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात जबरी चोरी आणि घरफोडीतील चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातून अटक केली आहे. चोरीतील मोबाईल पोलीसांनी हस्तगत केला असून जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अरबाज आरीफ पटेल रा. जाम मोहल्ला, भुसावळ असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

जळगाव शहरात एकाचा हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेण्याच्या सुचना वरिष्ठांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रणजीण जाधव, श्रीकृष्ण देशमुख, सचिन महाजन, ईश्वर पाटील, किरण चौधरी यांनी कारवाई करत संशयित आरोपी अरबाज आरीफ पटेल याला भुसावळ शहरातून अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपील जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content