चोपडा येथे स्वाभीमान रॅली उत्साहात

chopda aadivasi din rally

चोपडा प्रतिनिधी । येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त डॉ. चंद्रकांत बारेला व मित्र परिवार यांची भव्य स्वाभिमान रॅली आयोजित करण्यात आली होती.

स्वाभीमान रॅली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून सुरू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाबासाहेब आंबेडकर चौकात येवून पावसामुळे परत कृषी उत्पन्न बाजार समितीत येवून संपन्न झाली. पाऊस असूनही आदिवासी बांधवांचा उत्साह जाणवत होता. या मिरवणुकीत आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले. तालुक्यातील कोपर्‍यातून आदिवासी बांधव रॅलीत सहभागी झाले होते. यात सचिन पाटील, ईश्‍वर सुर्यवंशी ,अमोल राजपूत , दिपक वानखेडे , विजय बारेला, दिलीप बारेला,रेहमान तडवी, विनोद तडवी, राकेश पावरा ,शकील शेख, अज्जू भाई ,दिलावर पिंजारी, सलीम तडवी, जावेद शेख, लखन पाटील, स्वप्निल पाटील, रघन बारेला, राजू बारेला , सागर बारेला, ईश्‍वर भिल्ल, सागर कोळी, भुषण सोनवणे, वसंत कोळी आदींसह डॉ.चंद्रकांत बारेला आणि मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content