… आणि आज या भागात केली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरात अतिक्रमण निमुर्लन मोहिमेस वेग आला आहे. यात खंडेराव नगरात रस्त्यालगत असलेली दुकानासह घरांचे अतिक्रमण हटविण्यात येत असल्याने रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.

 

महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहे. या विकास कामांमध्ये अडथळा ठरणारे अतिक्रमणाचे निर्मुलन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानुसार आज खंडेराव नगरातील २५० पक्की अतिक्रमण काढण्यात आली. हे अतिक्रमण रेल्वे बोगदा ते हुडको रस्त्या पर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. हि कारवाई अतिक्रमण निर्मुलन पथक व नगररचना विभाग व बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. खंडेराव नगरातील अतिक्रमण काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. महापालिकेच्या वतीने १० ते १२ दिवसापूर्वी खंडेराव नगर परिसरातील नागरिकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे सुचविण्यात आले होते. यानुसार काही नागरिकांनी स्वतः हून अतिक्रमण काढले होते. आज जेसीबीच्या सहय्याने दहा फुट पुढे आलेले अतिक्रमित कंपाऊंड वाॅल, ओटे, सांडस, बाथरूम तोडण्यात आले. यावेळी काही नागरिकांनी विरोध केला तर काहींनी अतिक्रमण काढण्यास सहकार्य केले. यावेळी रामानंद नगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, काही नागरिकांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाशी हुज्जत घातल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान , उपायुक्त श्याम गोसावी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला सांगितले की, खंडेराव नगरात १८ मीटरचा रस्ता असतांना तो ९ मीटरचा देखील राहिलेला नाही. या रस्त्याची ५ ते ६ दिवसापूर्वी याची आखणी करून दिलेली आहे. नागरिकांनी अतिक्रमण निर्मुलन पथकास सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. ही कारवाई उपायुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, रचना सहाय्यक अतुल पाटील, चित्रशाखेचे सुभाष मराठे, हेमंत विसपुते, बांधकाम विभागाचे मनोज वडनेरे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1701384410067514

 

Protected Content