‘मतदानाचा हक्क महत्त्वाचा तर मतदान जागृती राष्ट्रीय कार्य – प्राचार्य डॉक्टर प्रमोद पवार

जळगाव प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार पंधरवड्यात ‘मतदानाचा हक्क महत्त्वाचा तर मतदान जागृती राष्ट्रीय कार्य असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर प्रमोद पवार यांनी केले.

“भारत संपूर्ण आशिया खंडात सर्वात मोठा खंडप्राय देश असून. भारतीय लोकशाही सर्वात जुनी आहे. सध्या आपण ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करीत असून त्याचे महत्त्व देखील सर्व सुजाने नागरिकांना माहिती असून युवा मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. लोकशाही मूल्य, संविधानाची चौकट आणि लक्षण मतदान पद्धती यावरच देशाचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो. त्यामुळे सुयोग्य व्यक्तीला सत्तास्थानी बसविण्यासाठी सर्वांनी जागरूकपणे मतदार नोंदणी करून मतदानाचा अत्यंत महत्वाचा व पवित्र हक्क बजाविला पाहिजे.” असे प्रतिपादन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता व अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी केले. ते सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार पंधरवड्यातच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी पुढे बोलताना डॉ.पवार यांनी, “युवकांनी मतदान जागृती या राष्ट्रीय कार्यात सामील व्हावे.” असे आवाहन करत त्यानी मतदान प्रक्रिया व पद्धतीची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन ‘तुळशी’ या ‘बहुगुणी’ वनस्पतीचे पूजन व जलसिंचन करून अभिनव पद्धतीने झाले. सहा.प्रा रविकांत मुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा.राजेंद्र देशमुख यांनी स्वागत केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, डॉ. एस. ए. गायकवाड, प्रा.आर.बी.देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अनिल वाघ यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच ऑनलाईन विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन व प्रतिज्ञा वाचन सहा.प्रा भाग्यश्री पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सहा. प्रा.पोर्णिमा देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा निखिल भोईटे, प्रा सोनाली रजकुंडल यांनी परिश्रम घेतले.

Protected Content