लेंडी नाला पुलाची समस्या लवकर सुटणार !; रेल्वे प्रशासनाचे आश्वासन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रोडवरील लेंडी नालावरील पुलाच्या समस्यांसह इतर अडचणींबाबत भुसावळ रेल्वे प्रशासनाच्या वतीने बुधवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी बैठक घेतली. यात नाल्यावरील पुलाच्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आश्वासन दिल्याची माहिती रेल्वे सल्लागार कमीटीचे सदस्य विनायक पाटील यांनी दिली.

 

भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागर कमिटीची बैठक २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आली. ही भुसावळ येथील समितीचे अध्यक्ष DRM श्री केडीया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी रेल्वेच्या दळणवळणात येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रत्येक सदस्यांनी आपल्या भागातील समस्या रेल्वे प्रशासनासमोर मांडल्या. रेल्वे सल्लागर कमिटीचे सदस्य विनायक पाटील यांनी जळगाव शहरातील समस्या मांडल्या. त्यात जळगावातील शिवाजी नगर परिसरातील स्मशानभूमी आणि ममुराबाद रोडवर असलेले लेंडी नाला पुलाची समस्या मांडली. रेल्वे लेंडीनाला पुलावरून जाते त्यावेळी रेल्वेतील घाण व कचरा खाली पडत असल्यामुळे पुलाखालून जाणारी वाहने थांबतात व वाहतूकीचा खोळंबा होता. त्यामुळे येथील समस्या कायमस्वरूपी मिटवावी अशी मागणी केली. यावर रेल्वे अधिकारी यांनी लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. अशी माहिती कमिटीचे सदस्य विनायक पाटील यांनी दिली आहे.

 

Protected Content