जळगावात एन. मुक्ताच्या केंद्रीय कार्यालय व फलकाचे अनावरण (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स असोसियशन अर्थात एन.मुक्ता या क.ब.चौ.उ.म.वि.परिक्षेत्रात प्राध्यापकांसाठी कार्य करणाऱ्या संघटनेच्या जळगाव येथे स्थापित करण्यात आलेल्या केंद्रीय कार्यालयाचे आणि कार्यालय फलकाचे उद्घाटन राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

एन.मुक्ताच्या केंद्रीय कार्यालय आणि कार्यालय फलकाचे उद्घाटनप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एल. पी. देशमुख, केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी, एन. मुक्ता संघटनेचे महासचिव डॉ.अविनाश बडगुजर, जळगाव जिल्हा सचिव डॉ.अजय पाटील आणि अन्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे संघटन गीत प्रताप कॉलेजचे डॉ. धनंजय पाटील यांनी सादर केले. त्यानंतर एन. मुक्ता संघटनेचे महासचिव डॉ.अविनाश बडगुजर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

केंद्रीय अध्यक्ष डॉ. नितीन बारी यांनी सांगितले की, ‘एन.मुक्ता ही प्राध्यापक संघटना विधायक मार्गाने आणि नीतीमूल्यांना महत्व देवून कार्य करणारी संघटना आहे. आपल्या संघटनेत खऱ्या अर्थाने एकाच ध्येयाला समर्पित सदस्य कार्यकर्ते आहेत, ही संघटनेची जमेची बाजू आहे. क.ब.चौ.उ.म.वि.परिक्षेत्रातील प्राध्यापकांच्या विविध समस्या निवारणासाठी, भविष्यात होणाऱ्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीच्या कार्यासाठी आणि विद्यापीठात कामानिमित्त आलेल्या धडगाव-तळोदा सारख्या लांबच्या ठिकाणावरील सदस्याला थांबण्यास मदत होईल, या हेतूने सदर प्रमुख कार्यालय जळगाव येथे उघडण्यात आले आहे.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी कार्य, कार्यकर्ता, कार्यालय, कार्यक्रम आणि कार्यकारणी याचे महत्व आपल्या मनोगतामधून विशद केले. आपल्या संघटनेच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ध्येय धोरणांची आखणी करतांना त्यात सर्व बाजूनी विचार करावा, त्यात निर्माण होणाऱ्या अडचणींचा अंदाज देखील घ्यावा, चर्चा-विचार विनिमय आणि एकमताने निर्णय घेवून आपल्या कार्याला गती द्यावी असे विचार सुद्धा दिलीप रामू पाटील यांनी मांडलेत. व्यासपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एल. पी. देशमुख आणि डॉ. जे. बी. नाईक, अधिसभा सदस्य मनीषा चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी कुलसचिव प्रा. डॉ. ए. एम. महाजन, प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रो. दीपक दलाल, विद्यापीठातील व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.ए.पी.डोंगरे, वाणिज्य अध्ययन मंडळ अध्यक्षा डॉ. कल्पना नंदनवार, संघटनेचे कायदे विषयक सल्लागार अॅड. प्रवीण पुर्भे, भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. जे. पाटील, फिजिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. पाटील, समाज कार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनोद रायपुरे, रा.से.यो.चे माजी संचालक डॉ. पंकज नन्नवर, धडगाव कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, दहिवेल कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे, डॉ. नितीन बडगुजर, प्रा. विजय लोहार, डॉ. बी. जी. देशमुख, चंद्रशेखर वाणी, डॉ.मनोज चोपडा, डॉ.भूषण कवीमंडन, डॉ. पावन पाटील, डॉ. अमरदीप पाटील, डॉ.अंशुमन मिश्रा, डॉ. राजेश भामरे, डॉ.दिनेश महाजन, डॉ.अनिल बारी आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायसोनी महाविद्यालयाचे डॉ.राजकुमार कांकरिया यांनी तर आभार बोदवड कॉलेजचे डॉ.अजय पाटील यांनी मानले. याशिवाय सोहळ्याला संघटनेमधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून विविध महाविद्यालयाचे १८० सदस्य आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती असे डॉ.चंद्रशेखर वाणी यांनी कळविले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/547532380229675

 

Protected Content