गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई

यावल –  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगावात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर यावल पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत २ हजार २५० रुपये किमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तालुक्यातील दहीगाव येथील जुना नायगाव रस्त्यावरील स्मशानभूमीच्या आडोशाला गावठी दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतिश कांबळे यांना मिळाली. त्यानुसार यावल पोलीस कर्मचारी स.फौ. नेताजी वंजारी, पो.ना. राजेंद्र पवार, पो.कॉ. भुषण पाटील, अनिल साळुंखे यांनी शनिवार, दि.९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दहीगाव येथील जुना नायगाव रोडवरील स्मशानभूमीचा बाजूला गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या संशयित आरोपी रविंद्र अंबादास पाटील रा. दहिगाव ता. यावल यांच्यावर छापा टाकला.

पोलीसांना पाहून संशयित आरोपी रवींद्र पाटील हा फरार झाला. यावेळी पोलिसांनी २ हजार २५० रुपये किंमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. याबाबत पो. कॉ. अनिल साळुंके यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रविंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

बीटच्या पोलीस कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीसा

यावल तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीर सुरू असलेले अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नवनियुक्त पोलीस निरीक्षक आतिश कांबळे यांना मिळाली होती. दरम्यान यावल पोलीस ठाण्याचे बिट कर्मचाऱ्यांच्या ढिलाईमुळेच हे अवैध धंदे सुरू असल्याने त्यांना आता पोलीस निरीक्षक कांबळे यांनी नोटीसा बजावल्या आहे. यावर अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Protected Content