धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झालेल्या अनोळखी तरूणाची ओळख पटली

मयत फैजपूर येथील रहिवाशी, तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा रेल्वेपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केलेल्या अनोळखी तरूणाची सोशल मिडीयाच्या मध्यमातून गुरूवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ओखळ पटविण्यात पोलीसांना यश आले आहे. फिरोज रज्जाक तडवी (वय-४०) रा. फैजपूर ह.मु. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवाशी फिरोज रज्जाक तडवी हे आपल्या पत्नी व तीन मुलांसोबत जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला होते. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.  जळगाव ते शिरसोली दरम्यान गिरणा पंपिंग रस्त्यावरील सावखेडा पुलाजवळ खांबा क्रमांक ४१५/०८ जवळ धावत्या रेल्वेच्या समोर आल्याने फिरोज तडवी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. सुरूवातील अनोळखी म्हणून जळगाव तालुका  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.  तपासाधिकारी पोहेकॉ लीलाधर महाजन यांनी सोशल मिडीयावर या घटनेबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी गुरूवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेवून मयत तरूण हा फिरोज तडवी असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content