संतापजनक : मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी २९ वर्षीय महिलेला तिच्या दोन्ही मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचारा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आले असून जामनेर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय महिला आपल्या दोन मुली व परिवारासह वास्तव्याला आहे. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता गावात राहणारा विक्की सुरेश पाटील (वय-२५) हा पिडीत महिलेच्या घरात घुसून तिच्या मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर सुरूवातीला कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर बुधवारी १ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून विक्की पाटील याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी विक्की सुरेश पाटील याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला विक्की पाटील याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहे.

Protected Content