समता नगरात जीर्ण विद्युत खांब कोसळण्याची भीती

महावितरणने तात्काळ नवीन खांब बसविण्याची नागरीकांची मागणी 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगर येथील डॉ  बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात असलेला विद्युत खांब खाली गंजला असून तो एका बाजूने वाकला आहे. त्यामुळे जीर्ण विद्यूत खांब कोसळण्याची भिती असल्याने महावितरण कंपनीने याकडे लक्ष देवून तातडीने नवीन खांब बसविण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे.

जळगाव शहरातील समता नगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सिमेंटचा विद्यूत खांब पुर्णपणे जीर्ण झालेल्या आहे. हा खांब एका बाजूने वाकला असल्याने स्थानिक गरिकांनी त्याला एका मोठ्या सिमेंट पाईपाचा आधार दिला आहे.  मात्र हा वीजखांब धोकादायक स्थितीत असल्याने हा खांब कधीही कोसळू शकतो. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक तसेच महावितरण यांच्याकडे तक्रारी केल्या असून देखील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या खांबावरून विद्दूत वाहिनी गेल्या असून  अशावेळी हा दुरवस्था झालेला विद्युत खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वीज महावितरण विभागाने लागलीच या धोकादायक विद्युत खांबाची दुरुस्ती करावी किंवा नवीन खांब बसवावा,अशी मागणी स्थानिक रहिवाशी भागाबाई बळीराम सोनवणे, रफिक शेख, शशु सतीश पांडे, शांताबाई निकम, जरीना बाई पिंजारी, पुष्पा बाई साळुंखे यांच्यासह इतरांनी केली आहे.

Protected Content