किरकोळ कारणावरून वृध्दाला दांडक्याने बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान योजनेतंर्गत मिळणाऱ्या पैशांची माहिती देत असल्याचा राग आल्याने दारुच्या नशेत  ६७ वर्षीय वृध्दाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार जळगाव तालुक्यातील नांद्रा गावातील बसस्थानकाजवळ १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी बुधवार ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे रतन विष्णू महाजन (वय ६७) हे वास्तव्याला आहे. १ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानक येथे तानकू काशीराम महाजन यांना पंतप्रधान योजनेतंर्गत मिळणाऱ्या पैशांची माहिती देत होते. त्यावेळी गोकुळ एकनाथ मराठे याचा राग आल्याने दारुच्या नशेत रतन महाजन यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या पायावर कुऱ्हाडीच्या दांडक्याने वार करीत गंभीर जखमी केले. या भांडणात रतन महाजन यांच्या खिशातील दहा हजारांची रोकड कुठेतरी पडून त्यांचे नुकसान झाले. याप्रकरणी रतन महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बुधवार ६ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हरिषकुमार शिंपी हे करीत आहे.

Protected Content