जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुजराल पेट्रोल पंप मागे असलेल्या अण्णा पाटील नगरातील साई मंदिरासमोरू एका व्यक्तीच्या ३ हजार रुपये किमतीच्या दोन सायकली अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, प्रशांत सुरेश महाजन (वय-४३, रा. अण्णा पाटील नगर साई मंदिर समोर गुजराल पेट्रोल पंप जळगाव) हे खाजगी कंपनीत नोकरीला आहे. २२ एप्रिल रोजी सकाळपासून वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर असलेल्या कंपाउंडमध्ये ३ हजार रुपये किमतीच्या दोन सायकली पार्कींगला लावल्या होत्या. या दोन सायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सायकाळी ४ वाजता उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून देखील सायकली मिळून न आल्यामुळे प्रशांत महाजन यांनी तालुका पोलिसात धाव घेतली. प्रशांत महाजन यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहे.