विद्यापीठात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

 

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने सोमवार, दि.१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची फलश्रुती’ या विषयावर डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.अनील डोंगरे यांचे व्याख्यान दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सामाजिकशास्त्र प्रशाळेतील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले असल्याचे डॉ. आंबेडकर विचारधाराचे कंत्राटी सहाय्यक प्रा. हर्षल पाटील व प्रा. विजय घोरपडे यांनी कळविले आहे.

Protected Content