चोरटी वाळू वाहतूक ; चालकाविरुद्ध गुन्हा ; मालकाला वगळले ! 

 

भुसावळ : प्रतिनिधी । जळगांवकडून वाळूची भरलेली ट्रक येत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळल्यावर पथकाला पाठवून वाळूच्या ट्रकला जळगांव रोड वरील वाय पॉईंट जवळ गुरुवारी पकडून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा नोंदवताना पोलिसांनी फक्त ट्रक चालकाला आरोपी केले आहे मालकाला मात्र मोकळे सोडले आहे

सध्या वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे.डंपर चालक भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.याला आळा बसविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या माफियाविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे

पोकॉ विशाल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी सकाळी एम.एच.१९ सी.वाय.९९९२ या ट्रकने रेतीची चोरटी वाहतूक चालक आरोपी राजेंद्र कोळी ( वय ३२ रा – साकेगाव) करीत असतांना जळगांव रोड वरील जॉली पेट्रोल पंपाजवळ ३ ब्रास ४ हजार रुपयांची रेती वाहतूक करतांना मिळून आला म्हणून शहर पोलीस स्टेशनला गुरुन ४७२/२०२० कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला २ लाख ४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.मालकाला गुन्ह्यातून वगळ्यात आल्याचे दिसत आहे. पुढील तपास पोहेकॉ इकबाल सैय्यद करीत आहे.

Protected Content