Beating : कारण नसतांना दोघी मित्रांना फायटरने मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना दोन जणांना फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, ललित प्रमोद पांडे  (वय-२०) रा. बळीराम पेठ हा आई, वडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करतो. गुरुवार २१ एप्रिल रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास ललित पांडे आणि त्याचा मित्र गौरव चंदनकर असे दोघेजण जळगाव रेल्वे स्टेशन येथे चहा पिण्यासाठी गेले. चहा पिऊन झाल्यानंतर ते दोघे पायी येत असतांना दत्त डेअरीजवळ मागून दुचाकीवर स्वप्नील ठाकुर, ललित दीक्षित व एक अनोळखी असे तीन जण  आले.  तू कुठे राहतो असे विचारले असता ललित म्हणाला की, बळीराम पेठ येथे राहतो, असे सांगितल्यावर त्यांनी तिघांनी काहीएक कारण नसताना यांनी ललित पांडे व त्याचा मित्र गौरव चंदनकर दोघांना फायटरने डोक्यावर मारहाण केली. यात दोघे जण जखमी झाले तर दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ललित पांडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बारीक करीत आहे.

Protected Content