दिवंगत शिक्षक कुमावत यांना खासदार पाटील यांनी रक्तदान करीत वाहिली श्रद्धांजली

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या वर्षी अपघातात जिव गमावलेले दिवंगत केंद्र प्रमुख लखीचंद कुमावत यांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वतः रक्तदान करीत खासदार उन्मेश दादा पाटील अनोखी श्रद्धांजली  वाहिली.

येथील धुळे रस्त्यावरील श्रीराम नगर ,शुक्ल विहिरीजवळ कुमावत सरांच्या राहत्या घरी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, शिवसेनेचे शहराध्यक्ष नगरसेवक नानाभाऊ कुमावत, नगरसेविका विजयाताई पवार, चाळीसगाव एजूकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर,महिला आघाडीच्या अध्यक्षा सविताताई कुमावत, बेलदारवाडी उपसरपंच ज्ञानेश्वर कुमावत, संस्थेचे सचिव महेंद्र कुमावत, प्रा.दुर्गेश भाटीवाळ, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन, आईं मेडीकल संचालक बापू चव्हाण,मोदी फॉर पीएम संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, शिवसेनेचे उप शहर प्रमुख निलेश  गायके,प्रफुल कुमावत, धीरज कुमावत,पंपल सिन्हा, हर्षल माळी, अजय पाटील,हितेश पाटील, रोहित कुमावत , गौरव पाटील,अरुण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने परिवारातील सदस्य मान्यवर उपस्थित होते.  जीवन सुरभी रक्तपेढीचे यावेळी सहकार्य लाभले.

दिवंगत लखीचंद कुमावत सर  यांनी आपल्या शिक्षकी पेशात अतिशय प्रामाणिकपणे सेवा देत असताना मात्र रस्ता अपघातात चूक नसताना त्यांना जीव गमावावा लागला होता. त्यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त खासदार उन्मेश दादा पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण करीत रक्तदान केले. यावेळी उपस्थित समाजबांधव मित्र परिवार यांनी खासदार उन्मेश दादा यांच्या कृतीयुक्त आदरांजली बद्दल आभार मानले. यावेळी सुमारे ७५ रक्त पिशवी संकलित करण्यात आल्या आहेत. या सर्व रक्तदात्यांचा सन्मानचिन्ह देऊन खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Protected Content