संप दुसऱ्या दिवशीही कायम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता बुधवारी दुसऱ्या दिवशीही संपावर कायम आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र कामकाज केले. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनें दुसऱ्याही दिवशी काळ्या फिती लावून रुग्णसेवा केली. राज्य वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने देखील संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे.

 

राज्यभरातील १७ लाख सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयातील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपत सहभाग घेतला आहे.  बुधवारी सकाळीही अधिष्ठाता कार्यालयाबाहेर महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणा दिल्या.

 

मोर्च्यात विजय जगताप, गोपाल साळुंखे, दिलीप मोराणकर, जे. एस. गवळी, समीर देवसंत, गणेश घुगे, नरेंद्र पाटील, गणेश धनगर, सूर्यकांत वसावे, देविदास गायकवाड, शीतल राजपूत, विजया बागुल, मंगेश जोशी, क्षितिज पवार, शामकांत दुसाने, विलास वंजारी, जे. एस. शिंदे, अनिल अवसरमल, संतोष टकले, प्रमोद वानखेडे, तुषार निळे, शिवकुमार पदरे, साहेबराव कुडमेथे, अनिल कापुरे, उमेश टेकाळे, गोपाल बहुरे, प्रकाश पाटील, किशोर आव्हाड, गणेश धनगर, प्रवीण डांगे आदी सहभागी आहेत.

 

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने दुसऱ्याही दिवशी कल्याफिती लावत रुग्णसेवा केली. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांचे कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शवित कामकाज केले.  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणीला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीनेदेखील बाहेरून पाठिंबा दिला आहे.

Protected Content