खंडेराव महाराज मंदीर जीर्णोद्धारसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथील श्री खंडेराव मंदिराच्या जीर्णोद्धारास आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कुदळ मारून प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष  माजी मंत्री गुलाबराव देवकर हे होते.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की सदर देवस्थानाच्या कामाचा प्रश्न हा कधीपासूनच प्रलंबित असल्यामुळे यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती. आता या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे वचन  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी घोषित केले असून या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी  प्रयत्नशील राहणार असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी  सांगितले .

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा येथे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिराची ख्याती आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रश्न प्रलंबित होता. जिल्ह्याचे  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  हे काम हातात घेण्यात आल्यामुळे  हे काम मार्गी लागले लागले आहे .

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर या दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी यांनी एकमेकांच्या कामाची स्तुती केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या मनोगतातून म्हणाले की जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव देवकर यांनी सुरू केलेली विकास कामे यापुढे देखील आपण कायम ठेवलेली आहेत जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये दोन्ही गुलाब जे एकच कुंभ राशीची आहेत त्यांनी विकास कामांना दिलेली गती ही जनतेच्या सेवेसाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली तर गुलाबराव देवकर यांनी सुद्धा गुलाबभाऊ पाटील यांच्या कामाला दाद  दिल्यामुळे उपस्थितांमध्ये हाच चर्चेचा विषय बनला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी देशमुख, पं. स. सदस्या ज्योतिताई महाजन, सरपंच दिलीप कोळी, उपसरपंच वर्षाताई भोळे, वाल्मिक पाटील, ऍड. विजय निकम, ललित मराठे,  दिलीपबापू धनगर , रवि देशमुख, तुषार महाजन, विलास चौधरी, पियुष पाटील, किशोर चौधरी, विनोद जोहरे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ललित मराठे, संजय पाटील, बाळकृष्ण पाटील,हेमंत पाटील, जेष्ठ नागरिक दिनकर पाटील, शिवाजी पाटील, उमेश बावसकर, अरुण पाटील, सुनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व  ग.स. चे माजी संचालक अजबराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले तर आभार सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी पाटील यांनी मानले.

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content