पिंप्राळ्यात बंद घर फोडले; सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील श्रीराम कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा भागातील श्रीराम कॉलनीत राहणारे मनोज रमेश पाटील (वय-४०) हे सेवानिवृत्त सैनिक आहे. सध्या ते एमआयडीसी भागातील खासगी कंपनीत सेक्यूरीटी गार्ड म्हणून नोकरीला आहे. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान मनोज पाटील हे घराला कुलूप लावून परिवारासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घरात कडी कोयंडा तोडून घरातील सुमारे ६९ हजार ६०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. हा प्रकार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी मनोज पाटील यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिश डोलारे करीत आहे.

 

Protected Content