निंभोरासिम येथे दरड कोसळून दोन ठार

raver 1

रावेर प्रतिनिधी । निंभोरासिम येथे दरड कोसळुन दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.7) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, निंभोरासिम विटवा रस्त्यावरील गट नंबर 46वरील शासकीय बरर्डीवर येथे बक-या चारण्यासाठी गेले असतांना अचानक वरुन दरड कोसळली. यात दीपक सवर्णे (वय-20 रा.निंभोरासिम) आणि सुषानंद सोपन पाटील (वय-22 रा. नायगाव) या दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे तर समाधान मरु कोळी (वय-20 रा. नायगाव) हे गंभीर जखमी झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी जखमींना तात्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. या घटनेची माहिती मिळताच मृत व्यक्तींचा कुटुंबांनी रुग्णालयात एकच आक्रोश केलाय. यावेळी गावकरांनी देखील प्रचंड गर्दी केलीय.

 

 

 

Protected Content