खामगावात प.पू.सदगुरु संत श्री भोजने महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

खामगाव प्रतिनिधी । दरवर्षी प.पू.सदगुरु संत श्री भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवास भाऊबीजेला सुरुवात होते. यावर्षी देखील प.पू.सदगुरु संत श्री भोजने महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. परंतु कोराना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. त्यामुळे संस्थानचे अध्यक्ष आ.ॲड.आकाश फुंडकर यांनी आज प.पू.सदगुरु संत श्री भोजने महाराजांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेऊन, “कोरोना संकट जाऊ दया व पुढल्या वर्षी पुण्यतिथी सोहळा थाटात संपन्न करण्याचे बळ द्या” अशी प्रार्थना केली.

प.पू.सदगुरु संत श्री भोजने महाराज पुण्यतिथी सोहळा आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत व ह.भ.प.रामायणाचार्य संस्थानचे विश्वस्त संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनात साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

यामध्ये  दि.5 नोव्हेंबर पासून ते 11 नोव्हेंबर पर्यंत दररोज किर्तन सादर करण्यात आले. ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खराटे मुर्तिजापूर, ह.भ.प.अरुण महाराज घोराडे आळंदी देवाची, ह.भ.प.अरुण महाराज लांडे पारस, ह.भ.प.गणेश महाराज हुसाड मेहकर, ह.भ.प.हरिदास महाराज पळसखेड आश्रम, ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताई नगर, ह.भ.प.संजय महाराज लहाने वाशिम, ह.भ.प.तुकाराम महाराज कडपे सेलू, या नामांकित किर्तनकारांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले.

या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता  ह.भ.प.रामायणाचार्य संस्थानचे विश्वस्त संजय महाराज पाचपोर गुप्तेश्वर आश्रम यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. दरवर्षी हा पुण्यतिथी सोहळा थाटात संपन्न होतो परंतु मागील वर्षी व यावर्षी कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे संस्थानेने शासनाच्या नियमानुसार साध्या पध्दतीने हा सोहळा साजरा  केला.  या पुण्यतिथी सोहळयाला बुलढाणा जिल्हयासह अकोला, जळगांव, जालना जिल्हयातील व संपुर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त दर्शनासाठी येतात.  याठिकाणी दर्शनास येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या लाखोंमध्ये आहे.

संपुर्ण पंचक्रोशीतील घराघरातून या महाप्रसादासाठी पोळया करुन दिल्या जातात. दिवसभर चालणाऱ्या महाप्रसादास ट्रक्टर व्दारे पंगती वाढल्या जातात.  त्यामुळे असंख्य लोक हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी देखील करतात. या पुण्यतिथी सोहळ्या दरम्यान दि.10 नोव्हेंबर रोजी श्री सागर फुंडकर, सहसंयोजक, महाराष्ट्र प्रदेश, भाजपा सोशल मिडीया सेल यांनी दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.  यासोबतच जिल्हयातील आमदार व प्रतिष्ठीत नागरीक भाविक भक्तांनी दर्शन घेतले. मोठया हर्षोल्हासात आनंदाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे किर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, वारकरी, पोलीस, तथा या सोहळयासाठी नित्य नियमाने सेवा देणारे गावातील भक्त या सर्वांचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी आभार मानले व येत्या काळात याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या श्री संत भोजनेमहाराज समाधीचे ‍ निर्मीती कार्यात सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या सोहळयाच्या यशस्वीतेसाठी श्री क्षेत्र अटाळी येथील गावकरी व संपुर्ण विश्वस्त मंडळ यांनी अथक प्ररिश्रम घेतले.

श्री संत भोजने महाराज यांचे भव्य समाधीचे निर्मीती कार्यात सहभागी व्हावे – ह.भ.प.संजय महाराज पाचपोर रामायणाचार्य आज या पुण्यतिथी सोहळयाच्या काल्याच्या किर्तनाचे वेळी ह.भ.प.संजय महाराज पाचपोर रामायणाचार्य यांनी प.पू. संत श्री भोजने महाराज यांची भव्य समाधी करण्यात येईल असे सुचविले व सर्वांनी या समाधीसाठी फुल न फुलाची पाकळी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

Protected Content