भुसावळात स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

bhusawal news 2

भुसावळ प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या यांच्याजंयती निमित्ताने 25 डिसेंबर रोजी आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात जामनेर रोड येथे स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, सरचिटणीस पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, नगरसेवक किरण कोलते, किशोर पाटील, देवा वाणी, प्रमोद सावकारे, अनिरुद्ध कुलकर्णी, गिरीश महाजन, निर्मल दायमा, निळकंठ भांरबे, प्रशांत पाटील, सुनिल सोनवणे, युवराज लोणारी, अमोल इंगळे, संजय शितोळे, शेखर इंगळे, खुशाल जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content