Home करियर भुसावळच्या शेख रफीक शेख मजीद यांचा संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा मंचावर प्रवेश 

भुसावळच्या शेख रफीक शेख मजीद यांचा संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा मंचावर प्रवेश 

0
5


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाची बाब समोर आली आहे. भुसावळ येथून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे Shikhar Organisation for Social Developmentचे Project Director तथा महाराष्ट्र राज्य सचिव शेख रफीक शेख मजीद हे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील Palais des Nations येथे होणाऱ्या 15th Forum on Business and Human Rightsमध्ये सहभागी होणार आहेत. २३ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मंचासाठी United Nationsच्या Indico प्रणालीद्वारे त्यांची नोंदणी मंजूर झाल्याचे तसेच अधिकृत Digital Badge प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या आंतरराष्ट्रीय मंचावर सहभागी होण्याच्या निमित्ताने भुसावळ तालुक्यातून जिनिव्हापर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या १७ वर्षांच्या सामाजिक कार्याच्या प्रवासाची चर्चा होत आहे. आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, महिला सक्षमीकरण, सरकारी योजनांचा लाभ आणि विविध जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांनी काम केले आहे. या अनुभवांच्या आधारे युवक, मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विषयांवर आंतरराष्ट्रीय संवादात सहभागी होण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

शेख रफीक शेख मजीद भारतातील युवक, सामाजिक न्याय आणि मानवाधिकारांशी संबंधित प्रश्न आंतरराष्ट्रीय संवादासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. युवकांना शिक्षण व कौशल्याच्या संधी, रोजगार व स्वावलंबन, महिला व बालकांचे अधिकार, वंचित घटकांचे प्रश्न, सामाजिक समानता आणि सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे या विषयांशी संबंधित अनुभव ते या चर्चेशी जोडणार आहेत.

शेख रफीक शेख मजीद यांच्या सामाजिक कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. लोकमतकडून सलग चार वर्षे सन्मान, दिल्ली पोलीस आयुक्तांकडून गौरव, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल, माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर, ABP Newsचे अँकर सुवध त्रिवेदी, अभिनेत्री दिशा वकानी तसेच मुंबईतील आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी Oxford, London येथे आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शेख रफीक शेख मजीद यांनी या प्रवासाबाबत सांगितले की, सामान्य कुटुंबातून येत भुसावळच्या गल्लीबोळातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. गरजू नागरिकांसाठी काम करताना अनेक अडचणी आल्या, मात्र समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द कायम राहिली. आता संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतातील युवा, मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विषयांवर विचार मांडण्याची संधी मिळत असल्याने ही जबाबदारी मोठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound