बुरख्यासोबत घुंगटप्रथेवरही बंदी घालणे आवश्यक : जावेद अख्तर

javed akhtar

 

मुंबई (वृत्तसंस्था) महिला सक्षमीकरणासाठी बुरख्यासोबत घुंगटप्रथेवरही बंदी घालणे आवश्यक आहे, अशी भूमिका प्रसिद्ध गीतकार आणि पुरोगामी विचारवंत जावेद अख्तर यांनी मांडली आहे. बुरख्यावरील बंदीच्या संदर्भातील वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे सांगत अख्तर यांनी आज पुन्हा ट्विट करत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

 

जावेद अख्तर यांनी आज (शुक्रवारी) पहाटे ट्विट करत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘काही लोक माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी असे म्हटले होते की, भलेही श्रीलंकेत हे सुरक्षेच्या दृष्टीने केले गेले असेल, मात्र खरे तर हे महिला सक्षमीकरणासाठी गरजेचे आहे. चेहरा झाकणे बंद व्हायला हवे, मग तो नकाब असो वा घुंगट. दरम्यान, बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानात होत असलेल्या ६ मेच्या मतदानापूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालण्याचे मत नोंदवले आहे.

Add Comment

Protected Content