वीजगळती कमी करण्यासाठी महावितरणाची सावद्यात धडक कारवाई

सावदा ता, रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा शहर व ग्रामीण भागात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध सावदा उपविभागाने धडक कारवाई सुरू केली आहे.

गेल्या आठवड्याभरात अशा ३० ग्राहकांची वीज जोडणी कापून मीटर जप्त करण्यात आले आहे. तसेच विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महावितरणाच्या वतीने कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून ज्या ज्या भागात विजेची हानी होत आहे अशा ठिकाणी वीज चोरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे.

या मोहिमेत ५० युनिट पेक्षा कमी वापर असलेले एकूण २३२ ग्राहकांच्या मिटरची कसून तपासणी करण्यात आली असून फेरफार असलेले ३० मीटर जप्त करण्यात आले; व सदरील ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये; अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन उप कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी केले आहे.

पथकात होता यांचा सहभाग –

वीज चोरी विरोधी धडक मोहीम पथकात सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योगेश चौधरी, सागर डोळे, योजना चौधरी, हेमंत चौधरी, मंगेश यादव, सचिन गुळवे, प्रसन्न साळुंखे व कर्मचारी यांचा समावेश होत.

खालीलप्रमाणे झाली आहे कारवाई –

सावदा शहर ०५, सिंगनूर १०, वाघोदा बुद्रुक ०६, चिनावल ०६, निंभोरा ०४, खिरोदा ०४,  गाते ०२, कोचुर ०३, बलवाडी ०१

Protected Content