अनिल लोहार यांना पीएच.डी.

जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे अनिल लोहार यांना जनसंवाद व पत्रकारिता या विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

अनिल लोहार यांनी “दीनमित्र” कार मुकुंदराव पाटील यांचे अग्रलेख : एक अभ्यास या शिर्षाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र भास्करराव चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, विवेक लोहार, प्र.कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर भटकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. जळगाव गाडीलोहार समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक जगन्नाथ काळू गोराणे यांचे ते सुपुत्र व जळगाव मनपाचे नगरसचिव सुनील गोराणे यांचे ते लहान बंधू आहेत.

Protected Content