Home Cities एरंडोल एरंडोल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली शपथ

एरंडोल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाची घेतली शपथ

0
52

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल नगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नगरपालिकेच्या आवारात पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेतली. 

माझी वसुंधरा या अभियानात 5 तत्वांचा समावेश आहे, जल, वायू, आकाश, अग्नी, पृथ्वी यांचे संवर्धन व बचतसाठी शपथ घेण्यात आली. याकामी शासनाकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेल्या शपथविधीचे वाचन न.पा.चे नोडल अधिकारी हितेश रविंद्र जोगी यांनी केले. सदर शपथविधी प्रसंगी एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश मुकुंदसिंग परदेशी, मुख्याधिकारी किरण शामराव देशमुख , नगरसेवक शेख जाहिरुद्दीन शेख कासम, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, पाणी पुरवठा अभियंता प्रियंका जैन, वसुली विभाग प्रमुख विनोद पाटील, शहर समन्वयक विवेक कोळी, सहायक प्रकल्प अधिकारी महेंद्र पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound