ताडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा; पाच सदस्यांची निवड बिनविरोध

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील ताडे ग्रामपंचायत वर आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकवला असून ९ पैकी ५ सदस्य बिनविरोध झाले आहे.

पाचही सदस्य शिवसेनेचे असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण पाटील, माजी सरपंच शातांराम पाटील, शरद पाटील, संभाजी धनगर, रविंद्र धनगर यांनी दिली.

बिनविरोध सदस्य पुढील प्रमाणे
वॉर्ड क्रमांक १ – अलकाबाई राजेंद्र पाटील,
वॉर्ड क्रमांक २ – सखुबाई नाना धनगर, रत्‍नाबाई लोटन भिल, पंढरीनाथ रामदास भिल
वार्ड क्रमांक ३ -सचिन पंडित पाटील

या पाच सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.

Protected Content