सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कणखर नेतृत्वाच्या आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणले. त्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचा पाया अधिक भक्कम झाला. देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्रप्रेम, निष्ठा, कणखर नेतृत्व आणि देशहितासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेचे स्मरण केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बंधुता आणि देशाची अखंडता जपण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमाला शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महायुतीचे पदाधिकारी, विविध समाजांचे प्रतिनिधी तसेच मुक्ताईनगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या महान कार्याप्रती आदर व्यक्त केला.लो



