शेतीच्या बांधावरून एकास जबर मारहाण; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शेतीचा सामाईक बांध कोरल्याच्या कारणावरून विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पुतण्याला जबर मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील पिप्री ब्रु. येथे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पिप्री ब्रु. येथील प्रविण राजेंद्र पाटील (वय-२६) यांनी शेतातील सामाईक बांध कोरल्याने तो आपल्या काकांकडे जाब विचारण्यासाठी गेला. मात्र वाद होऊ नये म्हणून तो लागलीच आपल्या घरी परतला. परंतु लगेच प्रविण पाटील यांच्या पाठीमागून काका संजय विक्रम पाटील, काकु मंगला संजय पाटील, कार्तिक संजय पाटील व हेमंत संजय पाटील हे येऊन शिवीगाळ करायला लागले. व कार्तिक यांनी त्यांच्या हातातील काठीने प्रविण पाटील यांना मारहाण केली. तसेच संजय पाटील व हेमंत पाटील यांनी त्यांच्या हातातील काठीने डाव्या खांद्यावर व पाठीवर जबर मारहाण केली. यात प्रविण पाटील यांना गंभीर दुखापत झाली. हि घटना २७ नोव्हेंबर रोजी ८:३० वाजेच्या सुमारास घडली. तत्पूर्वी प्रविण यांनी आरडाओरड केली असता वडील राजेंद्र पाटील व आई सुरेखा पाटील धावून आले. परंतु त्यांनाही चापट बुक्क्यांनी व लाथांनी मारहाण केली. यात प्रविण याला गंभीर दुखापती झाल्याने त्याला उपचाराकामी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात वरील चौघांविरुद्ध भादवी कलम- ३२५, ३९४, ४५२ व ४२७ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content