जळगावात डंपरने घेतला पुन्हा एक बळी : तरूणी ठार; भाऊ बचावला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव डंपरने आज पुन्हा एक बळी घेतला असून दुचाकीला दिलेल्या धडकेत तरूणी ठार झाली असून तिचा भाऊ थोडक्यात बचावला आहे.

शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक ( एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनी कडून रेल्वे उड्डाणपुराकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (वय-२० रा.खोटे नगर, जळगाव) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (वय २५ रा. खोटे नगर, जळगाव) हा थोडक्यात बचावला आहे.

ही दुर्घटना मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करावा लागेल दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी राखेने भरलेला डंपर ताब्यात घेतला असून याबाबत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content