जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येईपर्यंत गुरांचा बाजार बंदच – दिलीप वाघ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पाचोरा व भडगाव तालुक्यात व दर गुरवारी वरखेडी तसेच दर सोमवारी नगरदेवळा येथे भरणारे गुरांचे बाजार हे जिल्हा अधिकारी यांच्या दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार लम्पी स्किन डीसीज (Lumpy Skin Disease) या साथ रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आल्याने बंद करण्यात आलेले आहेत.

सदर गुरांचे बाजार चालू करण्यासाठी बाजार समितीने जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु अद्याप पर्यंत जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून गुरांचे बाजार चालू करणेबाबत आदेश प्राप्त झालेले नाहीत. तसेच गुरुवार दि. १० नोव्हेंबर रोजी उपबाजार वरखेडी येथे काही व्यापारी व शेतकरी यांनी गुरे विक्रीसाठी आणली होती. परंतु लम्पी स्किन डीसीज या साथ रोगाचा जनावरांमध्ये प्रसार होऊ नये व पशुधनाची हानी होऊ नये यासाठी जिल्हा अधिकारी यांचे गुरांचे बाजार चालू करणे बाबत आदेश प्राप्त होत नाही तो पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्याने बाजार समितीच्या गुरांच्या बाजारात गुरे व ढोरे विक्रीस आणू नये. असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा मा. आ. दिलीप वाघ यांनी केले आहे.

 

Protected Content