


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथील श्री वृंदावन धाम परिसरात गोसेवेचा एक महत्त्वपूर्ण अध्याय सुरू होणार आहे. संत श्री लक्ष्मण चैतन्य आश्रम ट्रस्ट अंतर्गत महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या आर्थिक सहकार्याने उभारण्यात आलेल्या नवनिर्मित श्री हरि गोपाल गोशाळेचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या सानिध्यात तसेच विविध संत-महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोशाळा शेड बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून साकारलेल्या अत्याधुनिक गोशाळेचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात येणार आहे. या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमामुळे परिसरातील गोभक्त, ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रांताधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार दिपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, उपविभागीय अधिकारी बडगुर्जर साहेब, पोलीस निरीक्षक जैस्वाल साहेब, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप सोड, गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा, जयेशभाई शाह जरीवाला, सुनील सूर्यवंशी, डॉ. रणजित पाटील, डॉ. प्रदीप काळे, डॉ. राधा रासवे, डॉ. रोहिदास राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, खासदार स्मिता वाघ, खासदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार सचिन बिरला, माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार अर्चना चिटणीस, आमदार झुमा सोलंकी, माजी आमदार शिरीष चौधरी, आमदार मंजू दादू, मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख रामेश्वर नाईक, भाजपा जिल्हाध्यक्षा नंदा ब्राह्मणे, चंद्रशेखर चिखले, महापौर दिपमाला काळे, प्रदीप पाटील, नगरसेवक अरविंद देशमुख, सोनवणे आप्पा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.या पवित्र सोहळ्यास विविध संत-महंतांचे आशीर्वाद लाभणार असून महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, मानेकर बाबा शास्त्री, स्वामी ब्रह्मानंदजी महाराज, महंत संभुजी तीर्थ महाराज, अनंत प्रकाश शास्त्रीजी, हरणे बाबा, स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, श्याम चैतन्यजी महाराज, विजयदासजी महाराज, पुरुषोत्तमदासजी महाराज, स्वामी राघवानंदजी भारती, विशुद्धानंद सरस्वतीजी महाराज, भावानंदजी महाराज, योगी दत्तनाथजी महाराज, गणेशगिरीजी महाराज, हरिशरणानंदजी महाराज, नाथ बाबा गेंदानाथ महाराज, धनराज महाराज अंजाळेकर आणि भरत महाराज अंजाळेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या आशीर्वादातून साकारलेल्या या गोसेवा प्रकल्पामुळे परिसरात धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होणार आहे. गोमातेच्या सेवेसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना आयोजक अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. श्री हरि गोपाल गोशाळा लोकार्पण सोहळा सोमवार, २९ जून रोजी सकाळी ११ वाजता श्री वृंदावन धाम, पाल, ता. रावेर येथे होणार असून संत-महंत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.



