अखेर रिया चक्रवर्तीला सशर्त जामीन

मुंबई – सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

विशेष न्यायालयाने रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळायला सांगितला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायलयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना जामीन मंजूर केला आहे.

रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांना जामीन देण्यास न्यायलयाने नकार दिला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे एम्सच्या अहवालात शिक्कामोर्तब झाले असताना त्याची आर्थिक संपत्ती अभिनेत्री रियाने लुबाडल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या खात्यावरून रिया व तिच्या कुटुंबीयांशी व्यवहार झाला नसल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालवू शकत नाही, या निष्कर्षाप्रत अधिकारी पोहचले आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.