एकनाथराव खडसे मुंबईत दाखल; घडामोडींकडे सर्वांचे लक्ष

मुंबई वृत्तसंस्था । भाजपचे असंतुष्ट नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आज सकाळी मुंबईत दाखल झाले असून ते शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरू आहे. खडसे यांच्यावर मध्यंतरी उपचार सुरू असल्याने ते घरीच होते. अनेक महिन्यानंतर ते आज पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले आहेत. ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द खडसे यांनी आधीच आपण भेट घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केलेला आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार खडसे व पवार यांची भेट निश्‍चित असल्याचे समजते.

अखेर रिया चक्रवर्तीला सशर्त जामीन

काही दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या कडून मते जाणून घेतली होती. यात काहींनी अनुकुल तर काहींनी प्रतिकूल मत व्यक्त केले होते. मात्र पवार यांनी खडसेंना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे समजते.

जम्मू-काश्मिरमध्ये दोन दहशतवादी ठार

Protected Content