भाजपचे अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक : नवाब मलिक

4Nawab Malik 14

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपची लाट ओसरली आहे. अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. आठवड्याभरात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा गोप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

 

एका वृत्त वाहिनीशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, मोदी लाट ओसरली आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचार करत आहेत, पण महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवलेल्या नेत्यांनाही पक्ष बदलायचा आहे. ज्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी आयुष्य खर्ची काढलं, त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यामुळे तेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत, असे म्हणत नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे इशारा केला. भाजपचे नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ते उत्सुक आहेत. एका आठवड्यात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा मलिक यांनी केला.

Protected Content